Peb Fort

विकटगड


विकटगड, नक्कीच तिखट गड आहे बुआ🙊, असं पाहायला वाटतो सोपा म्हणजे मी तर युट्युबला पहिले होते विडिओमध्ये पण तसा थोडा कठीणच आहे पाहूया कि पुढे 😉😉😉

मी🤠 आणि माझी पार्टनर😋 जाऊन आलो. जाऊन काय खूप अशी धम्माल करून आलो म्हणा 🤩🤩🤩

तसं जाण्याचे कारण यावेळी वेगळेच होते, ते तुम्हाला पुढे कळेलच. पहिलेतर आमचा दिवस कसा गेला पेब किल्ला (उर्फ विकटगड) ला ते सांगतो.......

तर माझी पार्टनर आणि मी कार रेंटलवर घेऊन आमच्या काही मित्रांसोबत निघालो. असे आम्ही 10 जण होतो आणि एका मैत्रिणीची भाची. तशी चिमुकली होती पण खूपच ऍक्टिव्ह, गाडीत नाही नाही म्हणता फुल्ल दोन-तीन वेळा ओकाऱ्या काढल्या🥴🤢🤮. काय करणार लहान आहे गाडी लागणारच, कितीही ती नाही बोलली तरी, आम्ही दोघांनी तिला सावरले आणि मग काय पोहोचलो माथेरानचा पायथ्याशी ट्रेकसाठी🤩🤩🤩....... 

वाह, आम्ही चौघे आणि आमचा बरोबर आमचे प्रिय मित्र "दुर्ग वेड " आणि त्यांचे सहमित्र मंडळी, चालायचा मार्ग मात्र त्यांनीच सांगितला. मस्त असा सरळ रुळावरून जाणारा रस्ता आणि त्यात निसर्गाची साथ, वाह क्या बात... क्या बात.....


निसर्गाने जणू धुक्याची चादर पसरवली होती माथेरानचा डोंगरांवर सगळीकडे असा पांढरा-शुभ्र असा देखावा. त्या देखाव्याचा आनंद घेत आम्ही पुढे आलो, वाटेत खूप सारे धबधबे लागले आणि खूप साऱ्या अशा सुंदर सोनेरी फुलांचा देखावा🌻🌻🌻... वाह मन खूप प्रसन्न झाले🥰🥰🥰

तो क्षण आला जेव्हा आम्हाला पेबला जाण्याची वाट दिसली आणि ती पण मस्त अशा दोन घंटा अडकवलेल्या दारात. तसं आम्ही पहिले गणपतीचे दर्शन घेण्यास निघालो म्हणजे आमच्या कामाचा श्री गणेशा होवो, किती किती छान चित्र काढलेले बाप्पाचे खूप सुंदर, त्यात आमचा असा सुयोग्य जुळून आलेला कि आम्हाला बाप्पाची आरती भेटली. त्यांना प्रणाम करत आम्ही पुढे पेब फोर्टकडे निघालो.
काय ते घनदाट जंगल आणि त्यातून ती पाऊल वाट, धुक्यात तर दिसेनाशी झालेली. थोडं कठीण वाटले पण आम्ही निघालो. मज्जा-मस्ती आणि जोक्स करत आम्ही एकमेकांना प्रोतसाहित करत होतो. 

एके ठिकाणी तर चांगलाच डोंगराचा कोना होता, जिथून दगडाला पाण्याचा पाझर पडलेला. त्यालापाहून सटाक्याची भीती आणि त्यापुढे चिखल तर आहेसच सटक्याला साथ द्यायला. (पहा तुम्ही विडिओ मध्ये )😂😂😂

मग अली अप-डाउनवाली वाट, आता मी हे असे का बोललो तुम्हाला फोटो आणि विडिओ पाहून कळेलच. हि वाट अशीच काही होती मस्त असे खाली उतरत चालत होतो आणि मग अचानक एका पॉईंटला, वर जायचे, कशी काय हि वाट बनवली असेल खरंच आश्चर्य वाटते, म्हणजे तुम्हीच सांगा आपण गड बोललो तर वाटते कि फक्त वर वर जायचेय असावे पण असे वर, मग खाली थोडे विचित्र तर आहेसच पण हि फजिती त्या काळातली होती. जेणे करून याठिकाणी कोणी येऊ नये आणि आले तर वाटसरू रस्ता विसरावे याकरीत अशी पाऊल वाट बनवली असावी,

गमतीदार आहे पण खरंच खूप चांगली शक्कल लढवली त्या काळात 😍😍😍

चला आता वर जाऊया, जल्लोष आणि घोषणा देत आम्ही चढत होतो, आणि पोहोचलो गडाचा पायथ्याशी. समोर छान असा निळा फलक होता ज्यात किल्ल्याचे नाव आणि माहिती होती खूपच सुरेख लिहिली होती. त्याचा मागेच लागून छान अश्या लोखंडी शिड्या होत्या, बहुतेक दोन माजली असाव्या. त्याच्या काही पायऱ्या थोड्या कमकुवत होत्या पण भार झेपेल अशा होत्या, त्या चढून आम्ही छान अशा धुक्याचा सानिध्यात आलो.

अक्षरशः, आम्हाला धुके आमचा समोरून वाहत आहे असे दिसत होते, पुढे आम्ही एका छानशा पॉईंटला भेट दिली, या पॉईंटची गंमत म्हणजे इथून आम्ही कुठून आलो आणि कुठे जातोय हे सगळे समजले. पहा म्हणजे जो वर पोहोचला तो येणाऱ्याला मार्गदर्शन नक्कीच करू शकतो आणि चुकवू पण नक्कीच शकतो हे मात्र नक्की 😉😉..... खूप छान असे निसर्ग रम्य दृश्य होते चोहीकडे घाणदाट असे जंगल आणि तो हवेतील गारवा. फार काही थांबलो नाही तिथे कारण पुढे अजून वर जायचे होते...


नेमके कुठे ? अहो, चला सांगतो तुम्हाला 🤩🤩🤩🤩🤩

तर आम्ही निघालो टोकावर, जिथे सुदंर असे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. वर जाताच पुन्हा आम्हाला लोखंडी पायऱ्या लागल्या, यावेळी सोपे वाटले चढणे पण जसे चालू केले हवा आम्हाला घाबरवत होती😱😱😱....... पण ठरवले तर जायचेच आणि आम्ही पोहोचलो..... (Video of way to temple and group pics)



दर्शन घेतले आणि काही वेळ आम्ही तिथे बसलो, खूप छान वाटले. मंदिराच्या आवारात बसने आणि तेहि निसर्गाचा आस्वाद घेत हे म्हणजे "सोने पे सुहागा" ❤️❤️❤️

आमच्या मंडळींना मंदिराच्या एका बाजूला माकडे दिसली मग काय त्यांना बिस्कीट आणि फळे देत चांगलेच रमले सगळे. यांनापाहून माणूस कोण आणि माकडे कोण कळेनाच 🙊🙊🙈🙈😂😂....... 

खूपच छान, प्राणी प्रेम हे अजून आहे आणि असणारच हे नक्की🤩😍🤩😍

सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ट्रेक पूर्ण केलीना सर्वांनी अजून काय हवे. महाराजांना मनाचा मुजरा करून आम्ही परतीला निघालो. 

स्टार्ट पॉईंटला पोहोचायला आम्हाला काही फारसा वेळ लागला नाही. खूप छान अशी ट्रेक झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट असा आनंद होता आम्हादोघांना हेच तर हवे होते. 😁😁😁

आमची म्हणजेच 🤠😋भुक्कडभटकेची😋🤠 पहिली ट्रेक सार्थक झाली 🥰🥰❤️❤️

अश्याच खूप साऱ्या ट्रेक आणि आठवणी आम्ही दोघे वाढवू आणि तुम्हा सगळ्यांसोबत शेर करू😊😊☺️☺️☺️☺️


निरोम घेतो तुमचा, ब्लॉग वाचल्या बद्दल खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

आम्हाला नक्कीच Follow करा @BhukkadBhatke





🤩😍🥰❤️🥳🌻 🤠😋 🌻🥳❤️🥰😍🤩

Comments

Post a Comment