Peb Fort
विकटगड विकटगड, नक्कीच तिखट गड आहे बुआ🙊, असं पाहायला वाटतो सोपा म्हणजे मी तर युट्युबला पहिले होते विडिओमध्ये पण तसा थोडा कठीणच आहे पाहूया कि पुढे 😉😉😉 मी🤠 आणि माझी पार्टनर😋 जाऊन आलो. जाऊन काय खूप अशी धम्माल करून आलो म्हणा 🤩🤩🤩 तसं जाण्याचे कारण यावेळी वेगळेच होते, ते तुम्हाला पुढे कळेलच. पहिलेतर आमचा दिवस कसा गेला पेब किल्ला (उर्फ विकटगड) ला ते सांगतो....... तर माझी पार्टनर आणि मी कार रेंटलवर घेऊन आमच्या काही मित्रांसोबत निघालो. असे आम्ही 10 जण होतो आणि एका मैत्रिणीची भाची. तशी चिमुकली होती पण खूपच ऍक्टिव्ह, गाडीत नाही नाही म्हणता फुल्ल दोन-तीन वेळा ओकाऱ्या काढल्या🥴🤢🤮. काय करणार लहान आहे गाडी लागणारच, कितीही ती नाही बोलली तरी, आम्ही दोघांनी तिला सावरले आणि मग काय पोहोचलो माथेरानचा पायथ्याशी ट्रेकसाठी🤩🤩🤩....... वाह, आम्ही चौघे आणि आमचा बरोबर आमचे प्रिय मित्र "दुर्ग वेड " आणि त्यांचे सहमित्र मंडळी, चालायचा मार्ग मात्र त्यांनीच सांगितला. मस्त असा सरळ रुळावरून जाणारा रस्ता आणि त्यात निसर्गाची साथ, वाह क्या बात... क्या बात..... निसर्गाने जणू धुक्याची चादर पसरवली होती ...